वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करू नका, विजय वडेट्टीवारांनी सांगितली आतली बातमी

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोप असलेला वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये आहे. मंत्री धनंजय मुंडे जवळचा आणि विश्वासू असलेल्या कराडची चौकशी सुरू आहे. यादरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक विधान केलं आहे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करू नका, असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना महायुती सरकारवही निशाणा साधला.

पोलीस २२ दिवसांमध्ये वाल्मिक कराडला पकडू शकले नाहीत हे त्यांचं अपयश आहे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी याचा एन्काऊंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी याचा वापर होईल तर हा पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे. मला विश्वसनीय माहिती जवळच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणामध्ये काहीही होऊ शकतं अशी शक्यता असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *