UPSCची तयारी : ‘यूपीएससी’ची बाराखडी

नव्या वर्षात अनेक तरुणतरुणी यूपीएससी परीक्षा देऊन आपली क्षमता अजमावणार आहेत. या युवा वर्गासाठी यूपीएससीची तयारी अगदी सुरुवातीपासून कशी करायची त्याचे मार्गदर्शन दर मंगळवारी आणि गुरुवारी डॉ. सुशील बारी या लेखमालेतून करणार आहेत. यात जानेवारी ते मे २०१५ पर्यंत पूर्वपरीक्षेची तयारी, अभ्यासक्रम, विश्लेषण, संभाव्य विषय, गतवर्षींचे प्रश्न यांचा उहापोह होईल. जून ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुख्य परीक्षेच्या एकूण ९ पेपर्सचे अभ्यासक्रम, विश्लेषण, बंधनकारक आणि पर्यायी विषयांची रणनिती, संभाव्य प्रश्न आदींविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

विद्यार्थी मित्रांनो, या सदरातून आपण UPSCच्या परीक्षेबाबत इत्थंभूत माहिती घेणार आहोत.दि. २५ मे २०२५ रोजी UPSC पूर्वपरीक्षा होणार असून त्यासंबंधीचे ‘ Notification’१२ जानेवारी रोजी UPSC द्वारे काढले जाईल. UPSC ची परीक्षा एकूण ३ टप्प्यात पार पडते – पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा व मुलाखत. या परीक्षेद्वारे IAS, IPS, IFS, IRS इ. विविध २१ सेवांकरिता UPSC उमेदवारांची शिफारस करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *