नाशिक जिल्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हादरला आहे. सकाळी दहाच्या सुमारास हत्येचा प्रकार घडला आहे. दोन आरोपींनी कुऱ्हाडीचा वार करुन एकाचे शिर धडावेगळे केले आहे. थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे परिसरात हलकल्लोळ झाला आहे. दोन्ही आरोपींनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.
नाशिकच्या पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ननाशी गावात हत्या झाली आहे. ननाशी गावातील प्राथमिक आरोंग्य केंद्राजवळ ही घटना घडली आहे. आरोपी सुरेश बोके आणि विशाल बोके यांचा गुलाब वाघमारे या व्यक्तीशी वाद होता. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास तिघे एकमेकांसमोर आले. त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरु झाली. वाद उफाळल्यानंतर हाणीमारी सुरु झाली. हाणीमारीत रागाच्या भरात बोके बंधूंनी गुलाब रामचंद्र वाघमारे याच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला आणि त्याचे शिर धडावेगळे केले.
Leave a Reply