कोल्हापूर (प्रतिनिधी)
काळम्मावाडी योजनेला विद्युत पुरवठा करणा-या मुख्य वीज वाहिनीवर पक्षी धडकल्याने ही लाईन सकाळी ट्रॅप होऊन या मुख्य वीज वाहिनीचा विद्यूत पुरवठा खंडीत झाला. या ठिकाणचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरळीत करण्याचे काम महापालिकेने युध्दपातळीवर महावितरणमार्फत हाती घेतले आहे. हे काम बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत पुर्ण होवून विद्यूत पुरवठा सुरळीत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरु आहे. सदरचे काम पुर्ण झालेनंतर तातडीने पाणी उपसा सुरू करण्यात येणार आहे. तसेच बालिंगा योजनेवर अवलंबून असणा-या सी व डी वॉर्डमधील नागरीकांचा पाणी पुरवठा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
काळम्मावाडी योजनेचा विद्युत पुरवठा पक्षी धडकल्यामुळे खंडीत





Leave a Reply