भारतीय संघाचा टेस्ट क्रिकेटमधील परफॉर्मन्स दिवसेंदिवस ढासळत असल्याने सध्या टीम इंडियाचे खेळाडू, कर्णधार, प्रशिक्षक इत्यादींवर टीका केली जात आहे. बांगलादेश विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकल्यावर टीम इंडियाला (Team India) न्यूझीलंड विरुद्ध सीरिजमध्ये क्लीन स्वीप मिळाला तर बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सीरिजमध्ये सुद्धा एडिलेड आणि मेलबर्न टेस्टमध्ये पराभूत होऊन टीम इंडिया 1-2 ने पिछाडीवर आहे. दरम्यान मेलबर्नमध्ये टेस्टमध्ये मिळालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर हेड कोच गौतम गंभीर याने ड्रेसींग रूममध्ये जाऊन खेळाडूंना झापलं. एकीकडे टीम इंडियाचा परफॉर्मन्स ढासळत असताना दुसरीकडे रोहित शर्मा – अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर आले आहे.
एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गौतम गंभीरने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी माजी प्रशिक्षक राहुल द्रविड प्रमाणे चेतेश्वर पुजाराला घेण्याची शिफारस केली होती. गंभीरला वाटत होतं की, 100 टेस्ट खेळलेल्या पुजाराचा अनुभव टीम इंडियासाठी कामी यावा. मागे ऑस्ट्रेलिया मिळवलेल्या दोन सामन्यांच्या विजयाचा शिल्पकार हा पुजारा होता. त्याने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांविरुद्ध मोठ्या धावा केल्या होत्या. तसेच पुजारा हा रोहित शर्मापेक्षा वयाने कमी आहे.
Leave a Reply