नववर्षाच्या मध्यरात्री वाहतूक पोलिसांनी शिस्तभंग करणाऱ्या वाहनचालकांवर मोठी कारवाई केली. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ८५ जणांवर कठोर कारवाई करण्यात आली, तर भरधाव गाडी चालवणाऱ्या २,६३३ चालकांवर दंड लादण्यात आला. या मोहिमेत एकूण २० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक पोलिसांनी शहरातील २७ ठिकाणी नाकाबंदी केली होती. या नाकाबंदीच्या दरम्यान मद्यपान करून वाहन चालविणे, ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वार, तसेच वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर विशेष कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलल्याने अनेकांची नशा उतरली. नववर्ष साजरे करताना सुरक्षितता आणि जबाबदारीचे पालन करण्याचा इशारा यामुळे पुन्हा देण्यात आला आहे.
Leave a Reply