भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah ) याने बुधवारी आयसीसी रँकिंगमध्ये अजून एकी मानाचा रोवला आहे. बुमराह हा आतापर्यंत टेस्ट गोलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग पॉईंट्स मिळवणारा भारतीय गोलंदाज आहे. बुमराह यापूर्वी माजी स्पिनर गोलंदाज आर अश्विन सोबत 904 रेटिंग पॉइंट्सवर होता. परंतु आता त्याने आर अश्विनला देखील मागे सोडलं आहे. बुमराह बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वात खतरनाक गोलंदाज आहे. त्याने सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चार सामन्यात 30 विकेट घेतल्या. तो स्पर्धेत सर्वात जास्त विकेट घेणारा देखील गोलंदाज आहे.
जसप्रीत बुमराहने 2018 रोजी साऊथ आफ्रिकेविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केले होते. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा शेवटचा सामना हा सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. सिडनीतील पाचव्या टेस्टमध्ये देखील बुमराह ऐतिहासिक कामगिरी करू शकतो. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सिरीजमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनण्यासाठी बुमराहला फक्त तीन विकेट्सची गरज आहे. सध्या हा विक्रम हरभजन सिंहच्या नावावर आहे. हरभजनने 2000-01 च्या मालिकेत 32 विकेट्स घेतल्या होत्या तर बुमराहने चार सामन्यात 30 विकेट घेतल्या होत्या.
Leave a Reply