महायुतीच्या अडीच वर्षांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी सत्कार सोहळ्यात मी पुन्हा येईन असं वक्तव्य केलं आहे. तसंच पुढील अडीच वर्षात काय होईल हे सांगता येत नाही असंही म्हटलं आहे.
“काही लोक धर्माच्या नावाने राजकारण करतात, काही लोक म्हणतात सिल्लोडला येणार, एकाला घरी बसवलं आता दुसरा येत आहे. पण, मी संभाजीनगरमध्ये येणार आणि गुंडगिरी सपंवणार, मंत्री असल्यावर असं कुणीही बोलू शकतं, असं म्हणतअब्दुल सत्तार यांनी नाव न घेता संजय शिरसाट यांच्यावर टीका केली. “कुछ देर तक खामोशी है, फिर कानो में शोर आयेंगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा तो दौर आयेगा” असा शेरही अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना ऐकवला.
Leave a Reply