उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी (Rajan Salvi) हे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार की भाजपमध्ये जाणार? याबाबत चर्चांना उधाण आले होते. तर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी राजन साळवी जर आमच्या पक्षात आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे वक्तव्य केले होते. आता यावर खुद्द राजन साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राजन साळवी म्हणाले की, पराभवाच्या वेदना आहेत. मला तुमच्याकडून कळतंय की मी नाराज आहे. मात्र या सर्व अफवा आहेत. मी बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहेत. पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात, तशा प्रकारचा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असेल. पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचे कर्तव्य असते. त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. मी मतदार संघात काम करत आहे. मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलेन, मी भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
Leave a Reply